Kalpana Chawla Science Centre
अॕड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या डाॕ. कल्पना चावला विज्ञान केंद्राची सुरूवात
मावळ तालुक्यातील विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्ट चे अॕड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा, १९९६ पासून आपल्या गुण वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नित्य नवे,विविध विषयांवरील उपक्रम अतिशय उत्साहाने, यशस्वीपणे राबविले जातात
२०२३-२४ ह्या येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यां मधे विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन याविषयी विशेष आवड निर्माण व्हावी यासाठी *अॕड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल,लोणावळा येथे,संचालक अॕड. माधवराव भोंडे यांच्या विषेश प्रयत्नातून कराड मधील,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ.संजय पुजारी यांच्या संकल्पनेतून साकारलेले डॉ.कल्पना चावला विज्ञान केंद्र नव्या स्वरूपात सुरू होत आहे.
कराड येथे डॉ.कल्पना चावला विज्ञान केंद्रा चा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे या उपक्रमांमधून (Isro) अवकाश संशोधन केंद्र, नासा साठी त्याचबरोबर डॉक्टर,इंजिनिअर,प्राध्यापक झालेले, संशोधनाकडे वळलेले,शास्त्रज्ञ झालेले अनेक विद्यार्थी पाहायला मिळतात learning By doing method ने विद्यार्थी प्रकल्प करतात प्रत्येक प्रतिकृती मागील वैज्ञानिक तत्वे जाणल्यानंतर उपकरणे तयार केली जातात . कराड येथील डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्राला राष्ट्रीय पुरस्कारासहसह अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
ह्या केंद्रा द्वारे लोणावळा परीसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सुरू होत आहेत.सुमारे १५००० चौ. फुटाच्या बंदिस्त जागेत अतिशय देखणी अंतर्गत रचना केलेले नियोजनबद्ध भव्य प्रदर्शन,प्रशस्त प्रयोगशाळा आणि अद्ययावत आॕडीटोरीयम तयार होत आहे.
ह्या डॉ.कल्पना चावला विज्ञान केंद्रा मधे विद्यार्थ्यासाठी एरोडायनामिक्स, रॉकेटरी,अग्नीबाण,खगोलशास्त्र, रोबोटिक्स,यंत्रमानव ,ज्येष्ठ शास्त्रज्ञांची व्याख्याने,स्लाईड शो, विविध मॉडेल्सची विद्यार्थ्यांकडून निर्मिती, (ISRO) अवकाश संशोधन संस्थेच्या क्षेत्रभेटी, विविध प्रकल्प ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोगशाळा, परिसर अभ्यास,पर्यावरण प्रदूषण यांचा अभ्यास व उपाय योजना,इत्यादी विषयांवर मार्गदर्शन असे विविध उपक्रम सुरू राहणार आहेत. (NEP) नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा नुसार विविध अभ्यासक्रमांची मांडणी केली जाईल.या विषयांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
केवळ विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नसून परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थी,पालक व शिक्षकांसाठी हा उपक्रम सुरु होत आहे.पहिलीपासून पुढे सर्व इयत्तांसाठी हा उपक्रम सुरू राहणार आहे.लोणावळ्यात सुरू होणाऱ्या या उपक्रमाची विज्ञान प्रेमींना देखील उत्सुकता आहे
“स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे !” हे डॉक्टर कल्पना चावला यांचे ब्रीद वाक्य घेऊन अॕड.बापूसाहेब भोंडे विद्यालय संचलित डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्रा ची वाटचाल नव्याने सुरू होत आहे .
याबरोबरच अॕड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लवकरच Nation Building School ही अखिल भारतीय स्तरावरची पहिलीच अंतराळ संशोधनाशी निगडित असणारी इंग्रजी माध्यमाची अद्ययावत निवासी शाळा सातवी आठवी, नववी, दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार आहे.या नव्या प्रकल्पा बाबतची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे विश्वस्त………. यांनी दिली.